🔺लोकसभा पोटनिवडणूक; ५३ टक्के मतदान.
नांदेड- बुधवारी सकाळी ७ वाजेपासून नांदेड जिल्ह्यात उत्स्फूतपणे मतदानाला सुरुवात झाली. अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत लोकसभा पोटनिवडणुकीसाठी ५३.७८ टक्के तर विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी ५५.८८ टक्के मतदान झाले आहे. नागरिकांनी मतदान करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते.
नांदेड जिल्ह्यात ९ मतदारसंघात किनवट मतदारसंघात ५८.४२ टक्के, हदगाव मतदारसंघात ६३.४६ तर – भोकर मतदारसंघात ६०.२५ टक्के, नांदेड उत्तर ५१.३४, नांदेड दक्षिण ५१.१७, – लोहा मतदारसंघात ५९.२८, नायगाव मतदारसंघात ५७.९८ टक्के, देगलूर मतदारसंघात ५१.३६ टक्के, मुखेड मतदारसंघात ५१.१६ टक्के मतदान झाले आहे.