पार्वतीबाई महादेव विटेकर यांचे निधन

परळी वैजनाथ दि.१३ (प्रतिनिधी)
शहरातील माणिकनगर भागातील रहिवासी पार्वतीबाई महादेव विटेकर (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

शहरातील माणिकनगर भागातील रहिवासी पार्वतीबाई महादेव विटेकर यांचे शनिवारी (दि.११) सकाळी ११ च्या सुमारास निधन झाले. सायंकाळी ४ च्या सुमारास येथील विरशैव लिंगायत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.पार्वती विटेकर अत्यंत मनमिळाऊ, धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगा,दोन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक महादेव विटेकर यांच्या पत्नी तर पोलीस जमादार वैजनाथ विटेकर यांच्या त्या आई होत.