संविधान दिनाचा अमृत महोत्सव

एक विशेष नाणे व टपाल तिकीट तर शाळांमध्ये प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन

नवी दिल्ली : राज्यघटना समितीने भारतीय राज्यघटनेचा मसुदा स्वीकारल्याच्या महत्त्वपूर्ण अमृतमहोत्सवा निमित्त
संविधानदिनी मंगळवारी जुन्या संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड़, पंतप्रधान नरेंद्र मोदी व लोकसभेचे
अध्यक्ष ओम बिर्ला उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती केंद्रीय सांस्कृतिक खात्याचे सचिव अरुणीश चावला यांनी दिली आहे.

या सोहळ्यानिमित्त देशभरातील अनेक शाळांमध्ये राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले जाणार आहे. या अमृतमहोत्सवा निमित्त संविधानदिनी सरकार या सोहळ्यासाठी एक विशेष नाणे व टपाल तिकीट जारी करणार आहे.