थंडीत घ्या जेष्ठ व लहान मुलांची काळजी

संग्रहित छायाचित्र

🔷 ◾दमेकऱ्याना ही होतो थंडीमुळे त्रास…

बीड/ परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क : पावसाळा दमदार झाला तर थंडीतही मोठ्या प्रमाणात वाढ होते. गत काही दिवसात वाढलेल्या थंडीमुळे ज्येष्ठंपेक्षा लहान मुलांना सर्दी खोकला असे आजार होत असल्याचे दिसून येत आहे. लहान मुलांना होत असलेल्या आजाराकडे दुर्लक्ष करू नये असे वैद्यकीय तज्ञांनी ही म्हटले आहे.

हिवाळ्यात लहान मुलांमध्ये सर्दी खोकला आणि तापेचे प्रमाण वाढल्यास त्यातून गंभीर हजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोठ्या आजाराचा धोका वाढतो.त्यामुळे लहान मुलांच्या आजारांकडे दुर्लक्ष करून नये असे शहरातील बालरोग तज्ञ बालरोग तज्ञ डॉक्टर गुरुप्रसाद देशपांडे यांनी सांगितले.

पावसाळ्याच्या वातावरणातील चार महिन्यानंतर वातावरणात होत असलेल्या मोठ्या बदलांमुळे सध्या सकाळी मोठ्या प्रमाणातील थंडी आणि त्यासोबतच थंडगार हवा आहे. उन्हाचा पारा ही कमी झाला आहे. अशा स्थितीत सर्दी, खोकला कफ झाल्याचे समजून किरकोळ आजार म्हणून बालकांच्या अशा आजाराकडे दुर्लक्ष केले जाते. एकूणच शहरातील रस्त्यावर वाढलेल्या धुळीच्या प्रमाणामुळे ही श्वसनाचे आजार आणि त्याबरोबरच सर्दी, खोकला, डोळे जळजळणे असे ज्येष्ठांचे आजारही दिसून येत आहेत.

घ्यावयाची काळजी

🔺सर्दी कफ झाला असेल तर दोन ते तीन वेळेस गरम पाण्याची वाफ घ्यावी. मुलांना आणि जेष्टाना गरम कपडे आणि नियमित पिण्यासाठी कोमट पाणी द्यावे.
🔺 सकाळ संध्याकाळ मधही घेतल्यास शरीराचा उष्मा टिकून राहण्यास मदत होईल, आणि रोगप्रतिकारशक्ती ही वाढेल. अधिक प्रमाणातील थंडी मुळे लहान मुला सोबतच ज्येष्ठ मंडळींनाही अस्थमाचा व श्वसनास त्रास होतो. कोरड्या हवामाना मुळे आणि वातावरणातील अधिकच्या धुलिकणा चा त्रास या कालावधीत जाणवतो. दरम्यान व्हायरल इन्फेक्शन, धाप लागणे, कोरडा खोकला येणे अशी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे आजार अंगावर न काढता डॉक्टरांना दाखवून घ्यावे.

डॉ. गुरुप्रसाद देशपांडे,
बालरोगतज्ञ, परळी वैजनाथ.