🔶 मराठी चित्रपट – मनोरंजन🔺 अभिनेत्री
🔺गदिमा पुरस्कार
पुणे । मराठी चित्रपट सृष्टीत एकेकाळी तमाम रसिकांच्या मनावर आपल्या अभिनयाने आपली स्वतंत्र ओळख आणि आढळस्थान निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना यंदाचा गदिमा पुरस्कार जाहीर झाला आहे , तर दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांना गदिमांच्या पत्नी विद्या माडगूळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव पुरस्कार देण्यात येणार आहे.
गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली.
२१ हजार रूपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे गदिमा पुरस्काराचे स्वरूप आहे. ११ हजार रुपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे गृहिणी सखी सचिव या पुरस्काराचे स्वरूप आहे. १४ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी पाच वाजता टिळक स्मारक मंदिर येथे होणाऱ्या गदिमा स्मृती समारोहात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.