परळीतील प्रसिध्द डॉक्टरवर विनयभंगासह अँट्राँसिटीचा गुन्हा

 ◾आरोपी डॉक्टरला अटक करण्यासाठी परळी शहर कडकडीत बंद

बीड परळी वैजनाथ-शहरातील  डॉक्टरांने एका युवतीवर विनयभंग केल्याची घटना घडली असून डॉक्टरवर विनयभंगासह अँट्राँसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे परळी शहरात खळबळ माजली आहे.या प्रकरणी आंबेडकरी चळवळीच्या वतीने शहरात शनिवारी (ता.३०)  बंदचे आवाहन केले होते. यास व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवून मोठा प्रतिसाद दिला.
येथील शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील फुलेनगर भागातील युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार फुलेनगर भागातील युवती शुक्रवारी (ता.२९) सायंकाळी ७.३० च्या सुमारास आपल्या बहिणीसह आजारी असल्याने कृष्णा टाँकीज परिसरातील डॉ दुष्यंत देशमुख यांच्या देशमुख दवाखान्यात तपासणी करण्यासाठी गेली. डॉ देशमुख यांनी तिला एका रुममध्ये पलंगावर झोपण्यास सांगितले. डॉ देशमुख यांनी येवून तिची तपासणी केली, तपासणी करत असताना टेटोस्कोपसह हाताने पाठीवर, छातीवर लज्जा येईल या पध्दतीने हात फिरवले व शरीर सुखाची मागणी केली. मला वाईट वाटले मी जोराने ओरडले, डॉक्टरांनी मला जातीवाचक शिवागीळ केली.पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास बघून घेईल असे म्हटले.मी मैत्रिणीसह पोलीस ठाण्यात जावून तक्रार दिली. फिर्यादीच्या तक्रारीवरून डॉ दुष्यंत देशमुख यांच्यावर अँट्राँसिटी व विनयभंगाचा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास  पोलीस उपअधीक्षक अनिल चोरमले करत आहेत.

दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी सायंकाळी पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर जवाम जमत डॉक्टरांना अटक करा अशा प्रकारची घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वाल्मिक कराडसह अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मध्यरात्री उशिरा डॉ देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी शनिवारी परळी बंदचे आवाहन केल्याने शहरातील व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवून मोठा प्रतिसाद दिला.

याप्रकरणी अट्रोसिटी ऍक्ट सह बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी डॉ. दृष्यांत देशमुख यास तात्काळ अटक करावे. याबाबत वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्यात यावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत.या प्रकरणात  परळी शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 – 74,भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023- 75(2), भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023  -79,अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती 3(1)(w)(i)- (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती,
3(1)(w)(ii) (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती 3(1)(r (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती,3(1)(s)(अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती ) 3(2)(va) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले हे करीत आहेत.