मुंबईत ६३ कोटींचा गांजा जप्त

संग्रहित छायाचित्र

🔶गुन्हेगारी /नशा – अमली पदार्थ –  🔶गांजा

 🔶 दोन महिन्यांत सीमा शुल्क विभागाने केलेली कारवाई 

मुंबई : देशभरात नशा आणि अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात येत असून यात प्रामुख्याने जहाज मार्गे आणि हवाई मार्ग हे प्रमाण अधिक आहे. त्या तुलनेत देशाच्या सीमेवरूनही मोठ्या  प्रमाणात अमली पदार्थ देशात येत आहेत. तस्करी होत असलेल्या अमली पदार्थांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे गांजाचे आहे. मागील दोन महिन्याच्या काळात सीमा शुल्क विभागाने मोठ्या कारवाया केल्या आहेत. पार देशातून त्यात बँकॉक येथून मुंबईत अमली पदार्थांच्या तस्करीत वाढ होत असून, गेल्या दोन महिन्यांत मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाने काही करवायात सुमारे  ६३ कोटी रुपयांचा गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी आतापर्यंत ११ लोकांना अटक करण्यात आली आहे.

नोव्हेंबर महिन्यात ३२ कोटी २९ लाख रुपयांचा गांजा जप्त करत चार लोकांना अटक केली आहे. ऑक्टोबर  महिन्यात सीमा शुल्क विभागाने सात प्रकरणांत २५ कोटी ६६ लाख रुपयांचा गांजा जप्त करत ७ लोकांना अटक केली होती, तर