वाघ शिकार प्रकरणी चार संशयित ताब्यात

संग्रहित छायाचित्र

🔷 वन आणि अभयारण्य 🔺जंगल सफारी

🔶 मेळघाटातील वाघ शिकार प्रकरण

अमरावती -परतवाडा – संरक्षित मेळघाट व्याघ्र प्रकल्पात  अंजनगाव वनपरिक्षेत्रातील कर्मचारी २६ नोव्हेंबर रोजी गस्तीवर असताना त्यांना वनखंड क्र. १०३२ येथे वाघ मृतावस्थेत आढळला होता. वाघाच्या शिकार प्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून मृत वाघाची चार नखे जप्त करण्यात आली आहेत.

या बाबतीत अधिक माहिती अंजनगाव वनपरिक्षेत्रातील कर्मचारी २६ नोव्हेंबर रोजी नियमित गस्तीवर असताना त्यांना व्याघ्र प्रकल्पातील वनखंड क्र. १०३२ येथे एक वाघ मृतावस्थेत आढळला होता दरम्यान मृत वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणामध्ये बल्लाखेडा (ता. अकोट, जि. अकोला) येथील चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून मृत वाघाची चार नखे जप्त करण्यात आली आहेत.