तापमानात ४ अंश वाढ, थंडीची पारा उतरला

🔷 चक्रीवादळाचा परिणाम ढगाळ वातावरण 🔺राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज

छत्रपती संभाजीनगर -नाशिक – राज्यातील थंडीचा पारा वातावरणातील अचानक झालेल्या बदलामुळे कमी झाला असून तापमानातही सुमारे तीन ते चार अंशाची वाढ नोंदल्या गेली आहे. हवामान तज्ञांच्या मते बंगालच्या उपसागरात फेंगल चक्रीवादळामुळे तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये जोरदार पाऊस झाला असून महाराष्ट्रात ढगाळ वातावरण तयार झाल्याने थंडीची तीव्रता कमी झाली आहे, राज्यात ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवला आहे.

उत्तरेकडील काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये बर्फवर्षाव होत असल्याने  चार दिवस थंडीचा कडाका वाढला होता. मात्र, शनिवारी पश्चिमच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे दक्षिणेतील वातावरणासह महाराष्ट्र केरळचा काही भाग आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये ढगाळ वातावरण आणि  मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर सोमवारी  महाराष्ट्रात अंशतः ढगाळ वातावरणामुळे थंडीची तीव्रता कमी झाली. यामुळे नागरिकांना थंडीपासून काही काळासाठी सुटका झाली आहे.