🔷 रेल्वे दुहेरीकरण
◾ परभणी-गंगाखेड-परळी रेल्वे दुहेरीकरण मार्ग बदलास मंजुरी
परभणी /गंगाखेड : शहरातील गंगाखेड परळी वैजनाथ जाणारा रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण काम होत असून पूर्वी हा मार्ग जुन्या शहर वस्तीतून जात होता दुहेरीकरणामुळे अनेकांच्या घरांचं मोठं नुकसान आणि घरांची पड झड होणार होती. दक्षिण मध्य रेल्वेच्या व्यवस्थापन समितीने हा दुहेरीकरणासहित चा नवीन मार्ग शहरा बाहेरून घेण्यास मंजुरी दिली. यामुळे या भागांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. रेल्वे विभागाच्या नांदेड डीआरएम कार्यालयाने गंगाखेड शहरातील नागरिकांसाठी मोठी शुक्रवार आनंद वार्ता दिली आहे.
प्रस्तावित परभणी-गंगाखेड-परळी दुहेरीकरणाच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. शहराच्या मध्यवस्तीतून दुहेरीकरणाचा प्रस्तावित मार्ग रद्द ठरवत शहरातील रेल्वेच्या जुन्या मार्गासह नवीन दुहेरीकरणाचा मार्ग शहराबाहेरून काढण्याच्या निर्णयास रेल्वे मंत्रालयाने प्राथमिक मंजुरी दिल्याची माहिती नांदेड डीआरएम नीती सरकार यांनी बुधवारी माध्यमांना दिली.
शहरात जुन्या रेल्वे मार्गावरील गेट क्र. १७ सातत्याने बंद राहिल्याने त्रस्त झालेल्या शहरवासीयांना मध्यवस्तीतून जाणाऱ्या रेल्वेच्या दुहेरीकरण मार्गाचा मनस्ताप वाढला होता. रेल्वे मार्ग दुहेरीकरणामुळे रेल्वे मार्गा नजीकची शेकडो घरे उठवली जाणार होती. रेल्वेच्या जुन्या मार्गासह नवीन प्रस्तावित दुहेरीकरणाचा रेल्वे मार्ग शहराच्या मध्यवस्ती ऐवजी शहराबाहेरून काढण्यात येणाऱ्या प्रस्तावास, तसेच नवीन नकाशास रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळाल्याची माहिती डी आर एम नीती सरकार यांनी दिली. याबाबत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांच्यासह खासदार संजय जाधव, आमदार रत्नाकर गुट्टे यांनीही रेल्वे मंत्रालय व प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.
उड्डाणपूलही रद्दप्रस्तावित सुमारे २०० कोटी रुपयांचा डॉ. आंबेडकर चौकातील उड्डाणपूलही रद्द होणारं असल्याचे यावेळी सांगण्यात आले.शहरातील रेल्वे गेट क्रमांक १७ हे दिवसातून अनेक वेळा बंद होते. त्यामुळे डॉ. आंबेडकर चौकातील वाहतूक कोंडी सततची डोकेदुखी होती. जुन्यासह नवीन दुहेरीकरणाचा मार्ग शहराबाहेरून जाणार असल्याने वाहतूक कोंडीला पूर्णविराम मिळणार आहे.