🔷 दक्षिण भारतीय चित्रपट/ सिनेमा🔺मनोरंजन 🔺पहिल्या दिवशीच्या तिकीटबारीचे सर्व विक्रम मोडले.🔺 दिग्दर्शन आणि संगीत या जमेच्या बाजू
अतिशय गाजावाजा करत पुष्पा चा भाग 2 ॲडव्हान्स बुकिंग पासूनच चर्चेत आला. ‘अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ : द रुल’ने पहिल्याच दिवशी २७० कोटींचा गल्ला जमवत इतिहास घडवला आहे. या भव्य चित्रपटाने बाहुबली २ आणि आरआरआरला मागे टाकीत जगभरातील पहिल्या दिवशीच्या तिकीटबारीचे सर्व विक्रम मोडीत काढले.
दक्षिण भारतीय राज्यात चित्रपट म्हणजे निव्वळ मनोरंजन आठवड्यात दोन चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळेच येथे चित्रपटाला उदंड असा प्रतिसाद मिळतो.अल्लू अर्जुनचा पुष्पा २ः द रुल चित्रपटाने पहिल्या दिवशी अंदाजे २७० ते २८० कोटींचा जागतिक व्यवसाय केला आहे. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटाने भारतात अंदाजे २०० कोटींची कमाई केली आहे, तर आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे ८.२५ अमेरिकन डॉलर दशलक्ष (७० कोटी रुपये) कमावले आहेत. त्यामुळे हा भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वांत मोठा ‘ओपनिंग डे’ ठरला आहे. पुष्पा-२ ने बाहुबली-२ आणि आरआरआरचे विक्रम मागे टाकले.
पुष्पा २ : द रुल या चित्रपटामुळे अल्लू अर्जुनने जागतिक सुपरस्टार बनला. अल्लू पर्वाला सुरुवात झाली आहे. या चित्रपटाने अनेक ठिकाणी विक्रम प्रस्थापित केला आहे. प्रमुख बाजारपेठ म्हणजे उत्तर भारतात या चित्रपटाने ७० कोटी रुपयांची कमाई केली आहे.