🔶 आरबीआय🔺 सुवर्ण साठा
नवी दिल्ली : जागतिक सुवर्ण परिषदेने गुरुवारी जारी केलेल्या अहवालानुसार, ऑक्टोबरमध्ये जगभरातील केंद्रीय बँकांनी ६० टन सोने खरेदी केले. ऑक्टोबर २०२४ मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने जगातील अन्य केंद्रीय बँकांच्या तुलनेत सर्वाधिक २७ टन सोने खरेदी केले. त्याबरोबर भारताचा एकूण सोने साठा वाढून ८८२ टन झाला आहे. यापैकी ५१० टन सोने साठा भारतातच आहे.
जागतिक सुवर्ण परिषदेने गुरुवारी जारी केलेल्या अहवालानुसार, ऑक्टोबरमध्ये जगभरातील केंद्रीय बँकांनी ६० टन सोने खरेदी केले. त्यात २७ टन सोने खरेदीसह भारताची केंद्रीय बँक प्रथम स्थानी आहे. १७ टन सोने खरेदीसह तुर्कस्तान दुसऱ्या, तर ८ टन सोने खरेदीसह पोलंड तिसऱ्या स्थानी आहे.
■ यंदा जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत ७७ टन सोनेखरेदी केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा ५ पट अधिक आहे.