🔶 आरोग्य अभियान 🔺आरोग्य 🔺 आजार – टीबी चा🔺 आरंभ हरयाणा राज्यातून.
नवी दिल्ली : टी बी उपचाराच्या परिणामात सुधारणा करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार १०० दिवसांचे टीबी निर्मूलन अभियान सुरू करत असून क्षयरोग रुग्णांचा शोध घेण्यासाठी, निदानासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी, टी बी उपचाराच्या परिणामात सुधारणा करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार १०० दिवसांचे टीबी निर्मूलन अभियान सुरू करत आहे.
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री जे. पी. नड्डा शनिवारी हरयाणा राज्यातून या अभियानाची सुरुवात करणार आहेत.प्रमुख भागधारकांच्या मदतीने हे अभियान सुरू करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
धोरणात्मक सुधारणांच्या अनुषंगान नुकत्याच हाती घेतलेल्य उपक्रमाअंतर्गत हे अभियान राबवण्यात येत आहे. देशातील ३३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील ३४७ जिल्ह्यांमधील टीबी निर्मूलनाच्या उद्देशाने हे अभियान राबवण्यात येणार आहे. या १०० दिवसांमध्ये टीबी रुग्णांचा दर, निदान, मृत्युदर यासारख्या प्रमुख निर्देशांकांच्या कामगिरीत सुधारणा होणे अपेक्षित आहे.