राधा मोहन साथी प्रतिष्ठान आयोजित ‘परळी चॅम्पियन लीग ‘ चे शानदार उद्घाटन

परळी ( प्रतिनिधी)- राधा मोहन साथी प्रतिष्ठान आयोजित व राजस्थानी मल्टीस्टेटचे चेअरमन चंदुलाल बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षेप्रमाणे यंदाही परळी चॅम्पियन सुरुवात झाली आहे .यंदाचे तिसरे वर्ष असून, शहरातील तहसील समोरील प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते शानदार उद्घाटन समारंभ संपन्न झाला.
परळी चॅम्पियन्स लीग २०२३ च्या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते स्व. मोहनलालजी बियाणी (काकाजी) यांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन करून करण्यात आले.उद्घाटन समारंभ परभणी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष संतोष जी बोबडे व महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशन निवड समिती सदस्य (अंडर १४) सुहास पावडे यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून, परभणी जिल्हा संपादक संघाचे अध्यक्ष नितीन धूत ,नायब तहसिलदार बाबुरावजी रूपनर, युवा नेते संजय देवकर यांची उपस्थिती होती तर राजस्थानी चारिटेबल ट्रस्टचे सचिव बद्रीनारायण बाहेती, बंसल क्लासेसचे व्हाईस स्टेट हेड प्रा. डॉ. आर.एस.बांगड सर , राकेश चांडक, मुरलीधर बंग, विनोद दराडे सर यांच्या प्रमुख उपस्थित उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
उपस्थित मान्यवरांचा व प्रमुख पाहुण्यांचा राधा- मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला.  यावेळी,महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशन जिल्हाध्यक्ष संतोष बोबडे म्हणाले की, क्रिकेट प्रेमींसाठी श्री.चंदुलाल बियाणी यांनी संधी उपलब्ध करून दिली आहे.तिच सोनं केलं पाहिजे. तसेच,दुसरे उद्घाटक महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशन निवड समिती सदस्य सुहास पावडे यांनी

परळी चॅम्पियन्स लीगच्या माध्यमातून भविष्यात क्रिकेटपटू निर्माण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली.तसेच, प्रा. डॉ. बांगड सर आपल्या मनोगतात म्हणाले कि, श्री.चंदुलाल बियाणी यांच कौतुक करावं तेवढं कमी आहे. अशा स्पर्धा कोणीही घेऊ शकत नाही. यावेळी सर्वच मान्यवरांनी उत्कृष्ट कार्याबद्दल चंदुलाल बियाणी यांचा सत्कार केला.
परळी राधा मोहन साथी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व राजस्थानी मल्टीस्टेटचे चेअरमन चंदुलाल बियाणी यांनी मनोगत व्यक्त केले. या स्पर्धेसाठी बंसल क्लासेसच्या वतीने ८१ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक असून, द्वितीय पारितोषिक ६१ हजार रुपये पोद्दार लर्न स्कूलच्या वतीने दिले जाणार आहे.

शहरातील तहसील समोरील मैदानात या स्पर्धा १३ मार्चपासून क्रिकेट प्रेमींना पाहायला व क्रिकेटचा आनंद लुटता येणार आहे. राधा मोहन साथी प्रतिष्ठान आयोजित परळी चॅम्पियनच्या उद्घाटन समारंभाला क्रिकेट प्रेमींची व नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. या स्पर्धेचे नियोजन गोपीनाथ कांगणे व मित्र मंडळ करीत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आनंद तूपसमुद्रे यांनी केले.