मुख्यमंत्री फडणवीस कोपर्डी हत्याकांडातील निर्भयाच्या बहिणीच्या लग्नाला उपस्थिती

🔶 सामाजिक 🔷 देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लग्न संपन्न

पुणे- शिरूर- :  अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी गावात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निघृण हत्या केल्याची घटना घडली होती.ही घटना सुमारें आठ वर्षांपूर्वी म्हणजेच १३ जुलै १६ रोजी या प्रकरणातील तीनही आरोपींना २०१७ साली फाशीची शिक्षा झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्रिक कुटुंबीयांचे त्यावेळी सांत्वन करताना तुमच्या घरातील लग्नकार्यास मी उपस्थित राहीन, असे आश्वासन दिले होते.

त्यावेळी फडणवीसांनी पीडित तरुणीच्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी स्वतः घेत सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची ग्वाही त्यांच्या कुटुंबाला दिली होती. रविवारी या लग्नास उपस्थित राहत मुख्यमंत्र्यांनी आपले आश्वासन पाळले.

पीडित तरुणीच्या बहिणीचे लग्न रविवारी टाकळी हाजी हद्दीतील निघोज कुंड परिसरात पार पडले. सुद्रिक आणि वराळ यांच्या विवाहानिमित्त आशीर्वाद देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आले होते. दरम्यान या लग्नसमारंभात आ. प्रवीण दरेकर यांनी मंगलाष्टका म्हटली.