कडाक्याच्या थंडीची लाट आणखी दोन दिवस; धुळ्यात नीचांकी ४,

🔷 थंडीची लाट; संभाजीनगर १२.२ 🔺राज्यात १८ डिसेंबरपर्यंत थंडीचा कडाका

अहिल्यानगर, नाशिक-एम एन सी न्यूज नेटवर्क- उत्तर भारतातील हिमवर्षावात मोठी वाढ झाली आहे आणि अति थंड  वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट असून त्याचा परिणाम म्हणून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका आहे.

दरम्यान अतिशय थंडगार वाऱ्यांमुळे मंगळवारी राज्यात धुळ्यात नीचांकी ४.० अंश सेल्सिअस तर छत्रपती संभाजीनगरात १२.२ अंश सेल्सियस तापमान नोंदले गेले. येत्या काही दिवस उत्तर महाराष्ट्रासह राज्यभरात थंडीची लाट तीव्र होणार असून राज्यात १८ डिसेंबरपर्यंत थंडीचा कडाका रहाणार आहे.

एकूणच या थंडीच्या कडाक्याचा रब्बी पिकांना  फायदा होईल असा अंदाज कृषी तज्ञांनी व्यक्त केला आहे.