यावर्षाचा ‘पंचमरत्न’ पुरस्कार सुरेश वाडकर यांना जाहीर

🔷 मनोरंजन- संगीत 🔺गायक🔺 ४ जानेवारी रोजी पुण्यात पुरस्कार प्रदान सोहळा

पुणे । मराठी, हिंदी आणि देशातील इतर अनेक भाषांत आपल्या गायनाने संगीत रसिकावर मोहिनी करणारे गायक पद्मश्री सुरेश वाडकर यांना यावर्षीचा पंचम रत्न हा पुरस्कार पुण्यात प्रदान करण्यात येणार आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम संगीतकार आर. डी. बर्मन (पंचमदा) यांचे चाहते असलेल्या पुण्यातील कलावंतांच्या एका समूहातार्फे दरवर्षी बर्मन यांच्याशी संबंधित कलाकारांचा ‘पंचमरत्न’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो.

या वर्षाचा हा पुरस्कार पद्मश्री सुरेश वाडकर यांना जाहीर करण्यात आला आहे. ४ जानेवारी रोजी स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे पुरस्कार प्रदान होईल,