परभणीत पारा घसरला; गारठ्यात मोठी वाढ

🔷 मराठवाडा गारठला हवामानात मोठा बदल 🔷 परभणीत किमान तापमान ४.१ अंश,

परभणी– मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्र यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून किमान तापमानात कमालीची घसरण झाली आहे. उत्तर भारतातील होत असलेल्या बर्फ वृष्टीआणि अति शितलहरी वाऱ्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात थंडीची लाट आली आहे. मराठवाड्यात सोमवारी ( दि.१६) रोजी परभणीत या हिवाळ्यातील सर्वात नीचांकी ४.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने तापमानाची नोंद घेतली.

मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्र येथून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, मागील काही दिवसांपासून किमान तापमानात कमालीची घट झाली असून  त्यामुळे खोकला,सर्दी, तापाच्या  रुग्णत वाढ देखील दिसून येतं आहे.