◾ पुरवणी मागण्यां ₹.३५,७८८ कोटींच्या
नागपूर- हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस सरकारने एकूण ३५,७८८.४० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर केल्या आहेत.महाराष्ट्र सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली असून नागपुरात १६ डिसेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत हिवाळी अधिवेशन होइल
पुरवणी मागण्या यात प्रामुख्याने लाडकी बहीण योजनेसाठी १४०० कोटी आणि साखर कारखान्यांना कर्जासाठी १२०० कोटी रुपयांच्या तरतुदीचा समावेश आहे. लाडकी बहीणसाठीची तरतूद मार्च २०२५ पर्यंतची रक्कम देण्यासाठी आहे.
महत्त्वाच्या पुरवणी मागण्यांचा तपशील असा (रुपये कोटीत) : केंद्र शासनाच्या राज्यांना भांडवली खर्चासाठी विशेष साहाय्य योजनेअंतर्गत ५० वर्षांकरिता बिनव्याजी कर्ज ३७१७.२९, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना (साधारण- रु. २७५० कोटी अनुसूचित जाती रु. १८० कोटी व अनुसूचित जमाती रु. १२० कोटी) – ३०५०, विविध पाटबंधारे महामंडळांना विविध योजनांतर्गत भाग भांडवली अंशदान – १९०८.०९, सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत रस्ते व पूल बांधकामासाठी आशियाई विकास बँकेकडून अर्थसाहाय्य – १५००, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना १४००, पंतप्रधान आवास घरकुल योजना १२५०, मुंबई मेट्रोसाठी राज्य शासनाचे दुय्यम कर्ज व समभाग – १२१२.५२, पात्र सहकारी साखर कारखान्यांना कर्ज १२०४.५८, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून अर्थसाहाय्य – ११७०,००, एकत्रित प्रोत्साहन योजनेत लघु, मध्यम, मोठे व विशाल प्रकल्पांना विविध प्रोत्साहनपर रक्कम देणे, ग्रामीण भागात अ.ज. घटकांना घरकुल देणे, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा हप्त्यासाठी ८१७.४० कोटी असे पुरवणी मागणीत नमूद आहे.
🔶 विभागानिहाय पुरवणी मागण्या व रक्कम
🔺विभाग रक्कम कोटीत
🔺सा. बां. ………… ₹ ७,४९०.२४ कोटी
🔺उद्योग, ऊर्जा ………..₹ ४,११२.७९ कोटी
🔺नगरविकास। ………₹ २,७७४.४३ कोटी
🔺इ. मा. बहुजन कल्याण ….₹ २,६००.३१ कोटी
🔺जलसंपदा …………. ₹ २,१६५.४७ कोटी
🔺महिला व बाल विकास ₹ २,१५५.४० कोटी
🔺कृषी ………… ₹ २,१४७.४१ कोटी
🔺वैद्यकीय शिक्षण ……₹ २,०४९.६९ कोटी
🔺ग्रामविकास ………..₹ २,००७.६९ कोटी
🔺आदिवासी विकास ..₹ १,८३०.७६ कोटी
🔺सहकार, पणन …….₹ १,३७७.५५ कोटी

