डॉ..सुधीर रसाळ यांना ‘विंदांचे गद्यरुप’ या समिक्षात्क पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार

🔷 साहित्य, समीक्षा

🔺साहित्य अकादमी साहित्य पुरस्कारांची घोषणा

नवी दिल्ली : मराठीतील सुप्रसिध्द समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना ‘विंदांचे गद्यरुप’ या समिक्षात्क पुस्तकासाठी मराठी भाषेकरिता साहित्य अकादमी पुरस्कार आज जाहीर करण्यात आला.

अकादमीचे सचिव, के. श्रीनिवासराव यांनी साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली. देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नाव लौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने, येथील कॉपर्निकसमार्ग स्थित साहित्य अकादमीच्या रविंद्र सभागृहात वर्ष 2024 साठी साहित्य पुरस्कारांची घोषणा केली. अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील 21 प्रादेशिक भाषांसाठी साहित्य अकादमी साहित्य पुरस्कारांची निवड व घोषणा करण्यात आली.

🔶 डॉ.सुधीर रसाळ यांच्या विषयी

डॉ.सुधीर रसाळ हे मराठीतील मान्यवर समीक्षक आणि लेखक आहेत. त्यांनी 1956 पासून मराठी वाङ्मयाची समीक्षा करत उल्लेखनीय योगदान दिले आहे.