५० हजार लाच घेणारी महिला पोलिस निलंबित

🔺लाच-लुचपत🔺लाचखोरी

🔷 गुन्हा दाखल न करण्यासाठी ५० हजार ची मागणी

सांगली  पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रार अर्जावरून गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच गुन्ह्यात मदत करण्यासाठी ५० हजारांची लाच घेणाऱ्या विश्रामबाग पोलिस ठाण्यातील महिला पोलिस हवालदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

तक्रारी अर्जावरून  गुन्हा दाखल न करण्यासाठी व आवश्यक सहकार्यासाठी लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे मनीषा नितीन कोगनोळीकर असे लाचखोर महिला पोलिसाचे नाव आहे. तक्रार अर्जावरून यातील तक्रारदार यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल न करण्यासाठी त्यांनी ५० हजार रुपयांची मागणी केली होती.