हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचे निधन

◾संग्रहित छायाचित्र

🔺Om Prakash Chautala passes away 🔺माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचे निधन

गुरुग्राम– हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचे आज शुक्रवारी गुरुग्राम येथील निवासस्थानी निधन झाले.
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि इंडियन नॅशनल लोक दलाचे (INLD) नेते ओम प्रकाश चौटाला यांचे (Om Prakash Chautala passes away) आज शुक्रवारी गुरुग्राम येथील निवासस्थानी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते
ओम प्रकाश चौटाला यांना त्यांच्या घरी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली.

माध्यमांना चौटाला यांच्या निधनाबाबतची माहिती इंडियन नॅशनल लोक दलाचे मीडिया समन्वयक राकेश सिहाग यांनी दिली आहे.