🔷 रेल्वे मार्गाचे काम 🔷 पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन
बीड, दि. 20 (जि. मा. का.) :- बीड शहरानजिक रेल्वे पूलाचे काम सुरु असल्याने मार्गालगत असणारा वळण रस्ता बंद करण्यात येणार असून वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या कपिल मुनी मंदिर पासून ज्या मार्गाने बीड रोड ओलांडून वाहने सध्याच्या वळण रस्त्याने जातात त्या रेल्वेमार्गालगतच्या वळण रस्त्यावर वाहतूक पुढील 15 ते 20 दिवस बंद राहणार आहे, असे रेल्वेतर्फे जारी एका प्रसिध्दीपत्रात म्हटले आहे.