प्रयागराज महाकुंभ : भुसावळमार्गे धावणार ४ रेल्वेगाड्या

🔶 प्रयागराज महाकुंभ : धार्मिक पर्यटन🔺 तीर्थक्षेत्र🔺भाविक भक्त

🔷 चार रेल्वे गाड्यांच्या  एकूण ३६ फेऱ्या

जळगाव-भुसावळ– प्रयागराज येथील महाकुंभ मेळाव्यासाठी पश्चिम रेल्वेकडून  भाविकांसाठी चार विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वे भुसावळमार्गे धावणार असून चारही रेल्वेच्या एकूण ३६ फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे गर्दी कमी होऊन भाविकांची गैरसोय दूर होईल.

🔺रेल्वे क्र. ०९०१९ वलसाड-दानापूर ही रेल्वे ८, १७, २१, २५ जानेवारी आणि ८, १५, १९ आणि २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.४० वाजता वलसाड येथून निघेल. तर दुस-या दिवशी दानापूरला पोहचेल. 🔺गाडी क्रमांक ०९०२० दानापूर-वलसाड ही रेल्वे ९, १८, २२, २६ जानेवारी आणि ९, १६, २० आणि २७ फेब्रुवारी रोजी दानापूर येथून रात्री साडेअकरा वाजता निघेल. व तिसच्या दिवशी वलसाडला पोहचेल.

🔺गाडी क्रमांक ०९०२१ वापी-गया ही रेल्वे ९, १६, १८,२०, २२, २४ जानेवारी आणि ७, १४, १८, २२ फेब्रुवारीला धावणार आहे.🔺 ०९०२२ गया-वापी ही रेल्वे १०, १७, १९, २१, २३, २५ जानेवारी व ८, १५, १९, २३ फेब्रुवारीला गया येथून धावणार आहे. या चारही रेल्वेंना वलसाड, भुसावळ, खंडवा, इटारसी येथे थांबा आहे. या चारही गाड्यांच्या ३६ फेऱ्या होणार आहेत.