चित्रपट 🔺मनोरंजन कलात्मक चित्रपट निर्मिती
🔷 8 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारने सन्मान
🔷 श्याम बेनेगल 🔺जन्म: १४ डिसेंबर १९३४🔺 निधन: २३ डिसेंबर २०२४
मुंबई– सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माते श्याम बेनेगल यांचे सोमवारी मुंबईत निधन झाले. सायंकाळी ६.३० च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते मूत्रपिंडाच्या आजाराने गेली काही वर्षे आजारी होते. मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची मुलगी पिया बेनेगल यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘ते दीर्घकाळापासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर डायलिसिसवर उपचार सुरू होते.
८ चित्रपटांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. श्याम सुंदर बेनेगल यांचा जन्म 14 डिसेंबर 1934 रोजी हैदराबाद येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला. आपल्या शिक्षण नंतर त्यांनी फोटोग्राफी सुरू केली. त्यांना बॉलीवूडमधील सिनेमाचे जनक देखील मानले जाते. त्यांच्या पश्चात पत्नी नीरा बेनेगल आणि मुलगी पिया बेनेगल असा परिवार आहे.
