गोवा लाखो पर्यटकांच्या स्वागतासाठी तयार

नववर्षाचे स्वागत
🔷पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पॅकेज आणि ऑफर किनाऱ्या वर प्रथमच आतषबाजी,
🔷नाताळ… सेंट फ्रान्सिस दशवार्षिक पार्थिव दर्शन सोहळा !

गोवा- पंजीम – देश आणि विदेशातील लाखो पर्यटकांना आकर्षित करणारा गोवा आता नवीन वर्षाच्या स्वागताला तयार होतो आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखो पर्यटक देशातून आणि विदेशातून गोव्यात दाखल होत आहेत. जगप्रसिद्ध गोव्यातील बागा बीचवर सूर्यास्त आणि सोबतीला समुद्राच्या लाटा उसळत आहेत. हातात मद्या चा ग्लास आणि झिंग आणणारं संगीत, देश-विदेशातील पर्यटक संगीताच्या तालावर नाचू लागले आहेत. आनंदाला उधाण येण्याची सुरुवात होत आहे .नवीन वर्षाची जोरदार तयारी सुरू आहे.

पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या गोव्यात उत्तर व दक्षिण गोव्यात १३५ किनारे आहेत. हॉटेल्स सरकारी खासगी मालकीचे ७०० रेस्तराँ, बार, वाईन दुकाने आहेत. गोव्यात खाणे-पिणे, जल्लोषाची सर्व व्यवस्था आहे. मनाला प्रसन्न करणारे फेसाळ लाटांच्या आवाजात स्वागत करणारे बागा, कलंगुट, कॅडोलिम, अंजुना, प्रत्येक किनाऱ्यावर पर्यटकांचा ओढा दिसतो आहे.

नवीन वर्षानिमित्त बागा येथे १००, कलंगुट-५०, पालोलेम-३०, कँडोलिम येथे २० हून जास्त रॉक्स आहेत. येथील लाइव्ह म्युझिकसारखे कार्यक्रम समुद्राच्या लाटांनाही थिरकायला लावत आहेत.गोव्यातील हॉटेल, रेस्तराँ नवीन वर्षासाठी विशेष ऑफर व पॅकेज घेऊन स्वागतासाठी सज्ज आहेत. यात कपल पॅकेज, ग्रुप पॅकेज, हनिमून पॅकेज, फॅमिली पॅकेज इत्यादी समाविष्ट आहे. देशभरातील पर्यटन सोबतच परदेशी पर्यटकांमध्ये रशिया, ब्रिटन, इटली, जर्मनी व अमेरिकेसह अनेक देशांतील पर्यटकांची बुकींग सुरूच आहे.विमानं कंपण्या, चार्टर्ड प्लेननेही पर्यटक येत आहेत.

🔷 नवीन वर्षाचं स्वागत

अनेक देशी आणि विदेशी पर्यटकांची गोव्यात नवीन वर्ष साजरे करायची इच्छा असते. या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्या साठी देश-विदेशातील सुमारे 15 ते 20 लाख पर्यटक पर्यटक गोव्यात येतील. यंदा आतषबाजी चांगल्या प्रकारे डिझाइन केली जात आहे. ३१ रोजी मध्यरात्री समुद्रावर दिमाखदार आतिश बाजी चे नियोजन होत असल्याची ही माहिती मिळते आहे. नववर्षानिमित्त अनेक पर्यटन गोव्यातील अनेक ऐतिहासिक चर्च ला भेटत देतात. ओल्ड गोवा चर्चही चर्चेत आहेत.

🔺येथे विशेष कार्यक्रम एक्स्पोझिशन (सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे दर्शन) अंतर्गत नाताळनिमित्त ख्रिश्चन भाविकही मोठ्या संख्येने येथे येत आहेत. हा दशवार्षिक पार्थिव दर्शन सोहळा आहे. तो ४ जानेवारीपर्यंत चालेल.

🔺सनबर्न गोवा म्युझिक फेअर २८ डिसेंबरपासून तीन दिवस चालनार असून. जगभरातील संगीतप्रेमी साठी ही विशेष मेजवानी असल्यामुळे यात लाखो पर्यटक सहभागी होतील. नवीन वर्षापर्यंत गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांचा उत्साह अधिक असेल तर चला, जाऊया गोव्याला