परळी-प्रतिनिधी – परळीचे भूमिपुत्र तथा छत्रपती संभाजीनगरमधील लेखापरिक्षक सहकारी संस्था गिरीश गणपतराव खिस्ते यांची सुकन्या व दयानिधी विनायकराव खिस्ते यांची चुलत बहीण डॉ. अंकिता गिरीश खिस्ते यांनी पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणातील (नीट-पीजी) परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवले.
डॉक्टर अंकिता यांनी 576 गुण घेतले असुन संपूर्ण भारतातून 4612 वा क्रमांक (रँक) मिळवला आहे. डॉ. अंकिता यांनी धुळ्याच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठीच्या परीक्षेत मिळवलेल्या यशा बद्दल डॉ. अंकिता यांचे सर्व स्तरातून अभिनंदन, कौतुक होत आहे.
