प्रा.नरेश काळे यांना विद्या वाचस्पती सारस्वत डॉक्टरेट पदवी प्रदान.

🔶 पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठाच्या वतीने इंदोर येथे..

बीड/परळी वैजनाथ :-परळी वैजनाथ येथे शिक्षणाला सर्वस्व मानून समाजातील तळागळात असणाऱ्या प्रत्येक प्रज्ञावंत मुला मुली पर्यंत खरे शिक्षण पोहंचविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहून शिक्षणाचा प्रचार व प्रसार करून शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल ,वाडी वस्ती तांड्यावर राहणाऱ्या गरीब मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना उच्च शिक्षणासाठी मदत व योग्य मार्गदर्शन करून केलेल्या सामाजिक कार्याबद्दल

तसेच एक विज्ञान शिक्षक म्हणून वैश्विक तापमान वाढीला तोंड देण्यासाठी विविध उपक्रम यशस्वीपणे राबवून एक नावीन्य पूर्ण पर्यावरण स्नेही मोहीम राबवली याबद्दल पंडित दीनदयाल हिंदी विद्यापीठ मथुरा यांच्या वतीने प्रा.नरेश काळे सरांना इंदोर येथे संपन्न झालेल्या भव्य दीक्षांत समारंभात *विद्या वाचस्पती सारस्वत डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.*

या भव्य दिक्षांत समारंभाचे अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंदुभूषण मिश्रा ,मुख्य अतिथी मा.न्यायाधीश श्री देवेंद्र कुमार जैन,विशिष्ठ अतिथी प्रदेश प्रभारी मुख्य मंत्री उदय योजना मध्य प्रदेश चे मा. विषणुकांत कनकने,मुख्य वक्ता सुप्रसिद्ध कथा वाचिका सुश्री दीपा मिश्राजी तसेच

विशेष उपस्थिती राष्ट्रीय पर्यावरणवादी
मा.डॉ विश्वनाथ पाणिग्रहजी आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते हा पदवी प्रदान सोहळा इंदोर येथील पंचतारांकित हॉटेल सयाजी येथे संपन्न झाला. अशा या दीक्षांत समारंभात भारतील विविध राज्यातून आलेल्या आणि शैक्षणिक, सामाजिक ,राजकीय ,क्रीडा ,साहित्य अशा विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करून देशसेेवेसाठी मोठे योगदान दिलेल्या ५३ व्यक्तीमत्वांना त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी ही पदवी प्रदान करण्यात आली.

प्रा.नरेश काळे हे परळी वैजनाथ येथील व्हिजन सायन्स अकादमीचे गेले २० पासून संचालक असून नाथरा येथील पापनाथेश्वर माध्यमिक विद्यालयात गेल्या पंधरा वर्षापासून विज्ञान सहशिक्षक म्हणून कार्य करत आहेत त्यांना मिळालेल्या या डॉक्टरेट पदवीमध्ये त्यांची पत्नी दिपाली काळे (चव्हाण) मॅडम ,त्यांचे आई वडील नीलावती नरहरी काळे, त्यांचे नातेवाईक,मित्रपरिवार आणि विशेष श्रीनाथ मानव सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ एकनाथ मुंडे,मार्गदर्शक डॉ.संतोष मुंडे, त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सुलेखा मुंडे(कराड)मॅडम

तसेच सहशिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्वात महत्त्वाचं त्यांचा प्रत्येक विध्यार्थी व विद्यार्थीनी ज्यांच्यामुळे ह्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा त्यांना ध्यास लागला ह्या सर्वांचा खूप मोलाचा वाटा आहे असे नरेश काळे सरांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.