परळी/ प्रतिनिधी- येथील गुरुकृपा नगर भागातील रहिवाशी अरुण पुरी यांचे आज मंगळवार दि. 14 मार्च रोजी दुःखद निधन झाले ते 58 वर्षाचे होते.
गुरुकृपा नगर येथील व्यवसायाने आरटीओ एजन्ट असलेले अरुण पुरी यांचे आज मंगळवार दि. 14 मार्च रोजी दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक भाऊ, दोन मुली, एक मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. अरुण पुरी हे सर्वांच्या परिचयातील मनमिळाऊ स्वभावाचे होते. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर आज दि. 15 मार्च रोजी अंत्यंसस्कार करण्यात आले.