🔷 नववर्ष
🔺मुंबईत चार पेक्षा अधिक पेग मिळणार नाहीत 🔺महानगरात होईल वयाची पडताळणी.
मुंबई– 31 डिसेंबर अखेर म्हणजे दर्दी मद्यप्रमींना सर्वात मोठी संधी. पिणाऱ्या ग्रुपच्या नियोजन बैठका पार पडल्या असून कुठे, कस, किती मित्र 31 डिसेंबर ला एकत्र येणार हे ठरल असलं तरी शेवटची महत्त्व पूर्ण गोष्ट म्हणजे अधिक प्रमाणात पिऊन रस्त्यांवर आढळून आल्यास पोलीस कारवाईचा बडगा उगार नार आहेत हे लक्षात घ्या.
अनेकांना मद्य सेवन करत 31 डिसेंबरच्या रात्री पार्टी करत नवीन वर्षाचे स्वागत कारायचे असते. यासाठी आता 31 डिसेंबरच्या रात्री पहाटे 5 पर्यंत हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, याच सोबत निर्बंध देखील लावण्यात आले आहेत. हॉटेल असोसिएशनने कुठलीही गडबड होऊ नये यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत.
मुंबईत हॉटेल असोसिएशनने ग्राहकांना आता चार मोठे पेग दिल्यानंतर दारू न पिण्याचे आवाहन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पार्टी करून परत घरी जाताना कुठली गडबड अथवा अपघात होऊ नये याची खबरदारी घेण्यास मदत होईल. याच सोबत असोसिएशनने ग्राहकांना दारू देताना वयाची पडताळणी करण्यासाठी ओळखपत्र देखील तपासण्याचे निर्देश दिले आहेत.
हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे सचिव प्रदीप शेट्टी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, 31 डिसेंबरच्या पार्टीच्या निर्णयाबाबत सर्व सदस्यांना कळवण्यात आले आहे. ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन सर्व निर्णय घेण्यात आले आहेत. ग्राहकांना चार पेग प्यायल्यानंतर नशा चढल्याचे वाटल्यास सुरक्षितपणे घरी पोहोचवण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना हॉटेल मालकांना देण्यात आल्या आहेत.
◾छोट्या गावात अनेक हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलांना देखील दारू दिली जात असल्याचे प्रकरणे सुद्धा समोर येत असून मोकळी जागा, मैदानावर पिणार्यावर अडचण निर्माण होऊ शकते.. त्यामुळे आता महाराष्ट्रातील तसेच मुंबईतील सर्वच हॉटेलमध्ये आता वयाची पडताळणी अनिवार्य केली आहे. यासाठी आता ग्राहकांना त्यांच्यासोबत ओळखपत्र सोबत ठेवणे देखील बंधनकारक आहे. अनेकदा