🔶 जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय बॅटरी चोरी प्रकरण
◾नोव्हेंबर महिन्यात सहाय्यक फौजदार अमित सुतार यांनी ३ तर २५ डिसेंबर रोजी ७ बॅटऱ्याची चोरी.
बीड-एम एन सी न्यूज नेटवर्क- सर्वसामान्य नागरिक आणि इतर ठिकाणी होणाऱ्या चोऱ्यांचा तपास पोलीस करतात, आता प्रत्यक्ष पोलीस अध्यक्ष कार्यालयातील वायरलेस विभागातील बॅटऱ्यांची चोरी उघडकीस आली. या प्रकरणात बीडच्या जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातून तब्बल १० बॅटऱ्यांची चोरी करणारा वायरलेस विभागातील सहाय्यक फौजदार अमित मधुकर सुतार यास पोलीस अधीक्षक नवनीत काँवत ‘यांनी गुरुवारी रात्री उशीरा तडकाफडकी निलंबित केले आहे.
बीडच्या जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात एकुण १० बॅटऱ्या चोरी गेल्या होत्या. या प्रकरणी सहाय्यक फौजदार अमित मधुकर सुतार (रा. खोकरमोहा ता. शिरूरकासार) व दुकानदार माधव गोरक्षनाथ जानकर (रा. वडगाव गुंदा ता.बीड) या दोघांविरोधात बीड शहर ठाण्याचे उपनिरीक्षक बाबुलाल यल्लाप्पा जाधव यांच्या तक्रारीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल झाला होता.
नोव्हेंबर महिन्यात सहाय्यक फौजदार अमित सुतार यांनी तीन बॅटऱ्या चोरी केल्या होत्या. ही चोरी कोणाच्या ही लक्षात न आल्याने नंतर त्यांनी पुन्हा बुधवार २५ डिसेंबर रोजी रात्री कर्तव्यावर असतांना कोणालाही न विचारता कार्यालयातून रूमची चावी घेवुन वायरलेस विभागातील आणखी ७ बॅटऱ्यांची चोरी केली.