🔷 पत्रकारास धक्काबुक्की, मारहाण🔺 पोलिसांत गुन्हा दाखल
बीड -(एमएनसी न्यूज नेटवर्क) शहरातील अंबिका चौकामध्ये बुधवार २५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पत्रकार संग्राम धन्वे यांना दोन तरुणांनी धक्काबुक्की करत मारहाण केली.
दुचाकींचे सार्वजनिक ठिकाणी कर्णकर्कश्य आणि फटाक्यासारख्या आवाज करणारे सायलेन्सर काढण्याची कारवाई शहरातील अंबिका चौक येथे वाहतूक शाखेची सुरू होती .दरम्यान वृत्तांकनासाठी पत्रकार संग्राम धन्वे यांनी सदरील कारवाईचे व्हिडिओ चित्रीकरण केले. मात्र त्यानंतर सदरील दुचाकीवरील दोन तरुण धावून आंगावर आले आमच्या गाडीची व्हिडीओ का काढतो म्हणत धक्काबुक्की करत मारहाण केली, या प्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

