🔷कृषी विषयक
बीड- परळी वैजनाथ – तालुक्यातील सिरसाळा येथील शुभम नेहा संजय फुलारी याने तयार केलेल्या शेतकऱ्यां संदर्भातील छत्रपती किसान सहाय्यक युनिट प्रकल्पाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दखल घेत कृषी मंत्र्यांना याबाबत पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबद्दल शुभमचे कौतुक होत आहे.
सिरसाळा येथील शुभम नेहा संजय फुलारी या युवकाने राज्यात विशेषतः मराठवाड्यात शेतकऱ्यांची होणारी हालअपेष्टा कमी करण्यासाठी छत्रपती किसान सहाय्यक युनिट प्रकल्प तयार करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दाखवला मंत्री नितीन गडकरी यांनी या संदर्भात दखल घेत माहिती घेऊन कृषीमंत्री भगिरथ चौधरी यांना पुढील कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यास सांगितले आहे.
या संदर्भातील शुभम फुलारी यांनी सांगितले की, मी “छत्रपती किसान सहाय्यक युनिट” नावाचा शेतकरी कल्याणकारी प्रकल्प तयार केला आहे. या प्रकल्पाची संकल्पना “थेट शासनापासुन शेतकऱ्यांपर्यंत” या तत्त्वावर आधारित आहे, जिथे सर्व सेवा एकाच छत्राखाली उपलब्ध असतील. हा प्रकल्प महाराजांच्या “रयतेच स्वराज्य” या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्याचा एक प्रयत्न आहे. माझे ध्येय आहे की या प्रकल्पाच्या यशामुळे शेतकरी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जसे बलवान आणि स्वावलंबीहोते तसे बनतील. या प्रकल्पाचा अहवाल मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सादर केला होता. त्यांनी माझ्या प्रकल्पाला पाठिंबा दर्शवला आहे. यासाठी मी त्यांचे हार्दिक आभार मानू इच्छितो.
नितीन गडकरी यांनी भागीरथ चौधरी यांना “छत्रपती किसान सहाय्यक युनिट” नावाच्या शेतकरी कल्याण प्रकल्पासाठी पाठिंबा देण्याची विनंती केली आहे.
