🔹संग्रहित छायाचित्र – परळी वीज निर्मिती केंद्र.
◾अनेक वर्षे परळीत ठाण🔺अत्याधिक बदल्या भुसावळ औष्णिक वीज निर्मिती केंद्रात
बीड-परळी-वैजनाथ एम एन सी न्यूज नेटवर्क- बदलीच्या ठिकाणी जाण्यास नेहमीच टाळाटाळ करण्यात येते हा सर्वांना आलेला अनुभव आहे. परळी वीज केंद्रातही गेले अनेक वर्ष ठाण मांडून बसलेल्या अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे .बदल्यांचे आदेश महाराष्ट्र राज्य वीज कंपनीचे अभियंता (तांत्रिक) राहुल नाळे यांनी काढले आहेत. राख, आणि इतर अनेक गैरप्रकार प्रकरणी होत असलेल्या आरोपच्या पार्श्वभूमीवर वीज केंद्र मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते
गेल्या दोन आठवड्या पासून परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. १३ ते २६ डिसेंबर या तेरा दिवसांच्या कालावधीत परळी औ.वि. केंद्रात तंत्रज्ञ २ (मंडळस्तरीय) ९२ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश महाराष्ट्र राज्य वीज कंपनीचे अभियंता (तांत्रिक) राहुल नाळे यांनी काढले आहेत. विशेष म्हणजे या सर्व बदल्या भुसावळ औष्णिक वीज निर्मिती केंद्रात करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख खुन प्रकरणात परळीच्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील राखेचा प्रश्न चव्हाट्यावर आल्यानंतर वीज केंद्र चर्चेत आले होते. तालुक्यात राखेच्या वाहतूक आणि त्यातून मिळणाऱ्या कोट्यावधी रुपयाच्या व्यवहारामुळे भांडणे, गोळीबार आणि गुंड शाही यावर मोठी चर्चा झाली.