पंकजाताई मुंडे यांची चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली भेट

संघटनात्मक बाबींवर झाली चर्चा ; आमदारांसह पदाधिकारी उपस्थित

मुंबई -भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांची आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या वरळी येथील कार्यालयात भेट घेतली. संघटनात्मक तसेच विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आज पंकजाताई मुंडे यांना भेटण्यासाठी त्यांच्या वरळी येथील कार्यालयात आले होते, विक्रांत पाटील हे देखील त्यांच्यासमवेत होते. पंकजाताईंनी यावेळी त्यांचे स्वागत केले. या दोघांमध्ये संघटनात्मक तसेच विविध विषयांवर चर्चा झाली. आ. नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, रमेश आडसकर, सदाशिव खाडे, विजयकांत मुंडे, देविदास नागरगोजे, चंद्रकांत फड, विष्णू घुले, गञेश पुजारी, अरूण राऊत आदी जिल्हयातील भाजपचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.