🔶 लाच प्रकरण 🔺३८ दिवस फरार 🔺चार दिवसांची पोलिस कोठडी
नांदेड– छत्रपती शाहू महाराज निवासी अपंग महाविद्यालय, काबरानगर नांदेड येथील लिपिक शिवराज बामणे व कुंटूरकर निवासी दिव्यांग कार्यशाळा राज कॉर्नर नांदेड येथील लिपिक चंपत आनंदराव वाडेकर असे लाच स्वीकारताना पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत नांदेड येथील कुंटूरकर निवासी दिव्यांग कार्यशाळेतील एका कर्मचाऱ्याने १३ नोव्हेंबर रोजी दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांची वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम काढण्या साठी ४० लाखांची लाच घेतल्याच्या प्रकरणात महिनाभरापेक्षाही अधिक काळ फरार असलेला मुख्याध्यापक यादव सूर्यवंशी अखेर, सोमवारी (दि.३०) लाचलूचपत प्रतिबंधक विभागासमोर शरण आला. दरम्यान, मंगळवारी (दि.३१) मुख्याध्यापकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरिक्षक गजानन बोडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी न्यायालयात हजर केले असता अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी त्याला ४ जानेवारी २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
दिव्यांग शाळेतील चार कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाची फरकाची सव्वा कोटींची रक्कम काढून देण्यासाठी, ४० लाखांची लाच मागण्यात आली होती. या प्रकरणात फरकाची रक्कम बँकेत जमा झाल्याबरोबर लाचेचे ४० लाख रुपये द्यावे लागतील, असे ठरले होते. त्यानुसार २२ नोव्हेंबर रोजी दुपारी वेळेदरम्यान तक्रारदाराने रक्कम काढून लिपीक शिवराज बामणे, लिपिक चंपत वाडेकर यांना दिली. या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले त्यांच्या चौकशीत मुख्याध्यापक यादव मसनाजी सूर्यवंशी प्रभारी मुख्याध्यापक वैभव निवासी शाळा खानापूर ता. देगलूर याचे नाव समोर आले होते. या अगोदर पकडलेल्या लोकांकडून लाचेचे ४० लाख रुपये जप्त करण्यात आले होते. तर शिवराज बामणे यांच्या अंग झडतीतून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ९८ हजार ५४०रुपये जप्त केले होते.
