नववर्षाच्या प्रथम दिनी मंदिरे फुलून गेली

🔶 नववर्षाच्या प्रारंभी देवदर्शनास मोठी गर्दी, 🔺त्रिंबकेश्वर, नाशिक, भीमाशंकर, औंढा, परळी वैजनाथ, घृष्णेश्वर आदी मंदिरे गर्दीने गजबजून गेली

नाशिक- शिर्डी : नववर्षाच्या निमित्ताने साईनगरीत नववर्षाच्या पहिल्या दिवशी दोन लाखांवर भाविकांनी साईदर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात केली. ३०,३१ तारखे पासून भाविकांची गर्दी झाली होती. गत दोन दिवसांत सुमारे अडीच ते तीन लाखांहून अधिक भाविकांनी साई चे दर्शन घेतले. नववर्षारंभी एका भाविकाने २६ तोळ्यांचा (साडेतेरा लाख) साईबाबांना अर्पण केला, *सुवर्णहार

साईंच्या साक्षीने रविवारी मध्यरात्री बारा वाजता साईमंदिरात साईनामाचा व भजनाचा गजर करण्यात आला. यावेळी राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्यासह हजारो भाविकांनी मध्यरात्रीच साईदर्शन घेऊन नववर्षाचा श्रीगणेशा केला. ३१ डिसेंबर रोजी साईमंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले होते.

🔶 सगळीकडेच रांगा – बुधवारी दिवसभर राज्यातील पाचही ज्योतिर्लिंग मंदीरात भाविक भक्तांचा  ओघ कायम होता. परळी वैजनाथ येथे शेजारच्या आंध्र प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक राज्यातील भाविकांची मोठी गर्दी झाली होती. तर १ तारखेस स्थानिक भक्त दिसून आले.

■ प्रसाद, फुल हार, मोबाइल व चप्पल ठेवण्यासाठी लाडू पाकिटे घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मध्यरात्री झालेल्या भाविकांच्या प्रचंड गर्दीने मंदिर परिसर गजबजून गेला होता.