◾ नशा🔺अंमली पदार्थ🔺हेरॉइन🔺ड्रग्ज🔺तस्करी◾ १२ अटकेत
पंजाब- अमृतसर (वृत्तसंस्था) पंजाबमधील अमृतसर पोलिसांनी सीमापार ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांच्या तस्करीच्या जाळ्याचा पर्दाफाश केला. या कारवाईत १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यात मुख्य साथीदार मनजीत सिंग उर्फ भोला याचाही समावेश आहे. तो पाकिस्तानातील कुख्यात तस्करांच्या संपर्कात होता.
पंजाबचे पोलिस महासंचालक गौरव यादव म्हणाले, या नेटवर्कमधील इतर सदस्यांचा आणि संपूर्ण तस्करीच्या साखळीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. याप्रकरणी छेहारटा पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.