१३ सराईत गुन्हेगारांना हद्दपार आदेश

🔶 हद्दपार आदेश  🔶 हिंगोली उपविभाग व सेनगाव तालुक्यातील गुन्हेगार 

हिंगोली : हिंगोली उपविभागातील हिंगोली व सेनगाव तालुक्यातील १३ सराईत गुन्हेगारांना महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ५६ व ५७ अन्वये सहा महिने व एक वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी दिले आहेत.

हिंगोली उपविभागातील  दहशत , गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या भिकाजी जगन काळे (रा. पारधीवाडा), अभय वसंत चव्हाण (रा. पारधीवाडी), रविकुमार ऊर्फ कुमारा संजू काळे (रा. सिध्दार्थनगर), अमोल संतोष पवार (रा. पारधीवाडा, ता. जि. हिंगोली), शंकर बाळाराम गांधी (रा. तलाबकट्टा, ता. जि. हिंगोली), ऋषिकेश भागवत टाले (रा. खुडज, ता. सेनगाव जि. हिंगोली), भारत हरि काळे (रा. पारधीवाडा, नर्सी नामदेव ता.जि. हिंगोली), शेख कदीर शेख सुलेमान (रा. लिंबाळा मक्ता ता.जि. हिंगोली), गौरव राजू गायकवाड (रा.रिसाला बाजार ता.जि. हिंगोली), अनिल लक्ष्मण महाजन (रा. सेनगाव, ता. सेनगाव), फैझल खान रहीम खान (रा.सीटी बेकरी जवळ, पूरपीडित कॉलनी, अकोट रोड, अकोला), सय्यद सलमान सय्यद मुस्ताफ (रा. खरबी ता.जि. हिंगोली) व अनिल गणपत काळे (रा.खरबी ता.जि. हिंगोली) अशा हिंगोली उपविभागातील हिंगोली व सेनगाव तालुक्यातील १३ सराईत गुन्हेगारांना महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ५६ व ५७ अन्वये सहा महिने व एक वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले.