जय भारती प्रतिष्ठानच्या अंबाजोगाई भूषण पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक अमर हबीब सन्मानित…

🔶जेष्ठ पत्रकार व साहित्यिक अमर हबीब सन्मानित

बीड -अंबाजोगाई: जय भारती बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठान घाटनांदुर यांच्या वतीने दिला जाणारा अंबाजोगाई भूषण पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ पत्रकार ,साहित्यिक व शेतकरी चळवळीचे नेते अमर हबीब काका यांना महाराष्ट्र गोवा वकील परिषदेचे माजी चेअरमन तथा सलग पाच वेळा महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे राहिलेले सदस्य व तसेच माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठविधीज्ञ ॲड वसंतरावजी साळुंखे साहेब यांच्या शुभहस्ते देण्यात आला.

जय भारती बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठान यांच्यावतीने दर तीन वर्षाला अंबाजोगाई भूषण पुरस्कार देण्यात येतो. प्रथम पुरस्कार अंबाजोगाई येथील मानवलोकचे कार्यवाहक स्वर्गीय द्वारकादासजी लोहिया उर्फ बाबूजी यांना देण्यात आला होता.त्यानंतर अंबाजोगाईचे भूमिपुत्र मा. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय अंबादासरावजी जोशी साहेबांना सन 2020 मध्ये अंबाजोगाई भूषण पुरस्कार जाहीर झाला होता.त्यानंतर चालू वर्षी अंबाजोगाई भूषण पुरस्कार हा अंबाजोगाई शहरातील ज्येष्ठ पत्रकार,शेतकऱ्यांसाठी अविरतपणे संघर्ष करणारे शेतकऱ्यांचे नेते व तसेच साहित्यिक अमर हबीब काका यांना अंबाजोगाई भूषण पुरस्कार देण्यात आला . या पुरस्काराचे वितरण हे महाराष्ट्र गोवा वकील परिषदेचे माजी चेअरमन तथा सलग पाच वेळा महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे राहिलेले सदस्य व तसेच माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठविधीज्ञ ॲड वसंतरावजी साळुंखे साहेब यांच्या शुभहस्ते या पुरस्काराचे वितरण छत्रपती संभाजी राजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणामध्ये करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बीग बॉस फेम छोटा पुढारी घनश्यामजी हे व तसेच उच्च न्यायालयातील ॲड टेळे आण्णा , ॲड देवणे साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सन्मान पत्राचे वाचन हे प्रा सुनील साळुंखे यांनी केले.तसेच जय भारती सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड माधव जाधव,उपाध्यक्ष प्रा सुनील साळुंखे,सचिव ॲड अनिल लोमटे,कोषाध्यक्ष राजू शेठ भन्साळी सहसचिव जीडी थोरात व त्याचप्रमाणे संस्थेचे पदाधिकारी योगगुरू इंजिनियर परमेश्वरजी भिसे सर,ॲड श्रिनिवास अंबाड, शेतकरी नेते कालिदासराव आपेट व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष ॲड माधव जाधव यांनी केले.