३ जानेवारीपासून हैदराबाद- जयपूर रेल्वे 

🔺नांदेड, पूर्णा, वसमत, हिंगोलीमार्गे धावणार 🔺व्यवसाईक आणि पर्यटकाना फायद्याची

नांदेड : मराठवड्यातील प्रवाशी नागरिकांसाठी महत्वपूर्ण अशा विशेष गाड्या नांदेड मार्गे  सुरू होत असून त्याचा फायदा होऊ शकतो. ३ जानेवारी पासून हैदराबाद- जयपूर- हैदराबाद आणि काचीगुडा -बिकानेर- काचीगुडा या दोन स्पेशल ट्रेन नांदेडमार्गे धावनार आहेत.  गाडी क्रमांक ०७०२० हैदराबाद- जयपूर या विशेष गाडीला ३ जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दर शुक्रवारी रात्री ७.५० वाजता ही गाडी हैदराबाद येथून सुटेल. सिकंदराबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, खंडवा, उज्जैन, अजमेरमार्गे जयपूरला रविवारी सकाळी ५.२५ वाजता पोहोचेल,

गाडी क्रमांक ०७०१९ जयपूर- हैदराबाद ही गाडी ५ जानेवारीपासून दर रविवारी दुपारी ३.३० वाजता जयपूरवरून सुटेल. आलेल्या मार्गानेच हैदराबाद येथे मंगळवारी सकाळी ५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०७०५३ काचीगुडा – बिकानेर ही गाडी ४ जानेवारीपासून प्रत्येक शनिवारी रात्री ८ वाजता काचीगुडावरून सुटेल. ही गाडी  निझामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, वसमत, हिंगोली, अकोला, खंडवा, भोपाळ, जयपूर, सिखर, रतनगढमार्गे सोमवारी दुपारी ३ वाजता बिकानेरला पोहोचेल, तर गाडी क्रमांक ०७०५४ बिकानेर- काचीगुडा ही गाडी ७ जानेवारीपासून दर मंगळवारी दुपारी १.३० वाजता सुटून आलेल्या मार्गानेच काचीगुडा येते गुरुवारी सकाळी ७.४० वाजता पोहोचेल.

🔺गाडी क्रमांक ०७०२० ही गाडी शनिवारी रात्री १ वाजता नांदेडला पोहोचेल 🔺 गाडी क्र. ०७०५३ ही गाडी रविवारी पहाटे ४.२९ वाजता नांदेडला पोहोचेल.