🔶 श्रद्धा आणि भक्ती 🔶 विठुरायाच्या चरणी लाखो भाविकांनी टेकला माथा.
सोलापूर- पंढरपूर : गेल्या वर्षीच्या शेवटच्या दहा दिवसांमध्ये विठुरायाच्या चरणी भेट देणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे मंदिर समितीने दिलेल्या माहितीनुसार २०२४ या वर्षअखेरच्या दहा दिवसांत ३ लाख ८२ हजार १३७ भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे. या कालावधीत २ कोटी ४१ लाख ५९ हजार २८७ रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार विठुरायाच्या चरणीमाथा टेकण्यास येणाऱ्यांची दि २१ डिसेंबर २०२४ ते ३१ डिसेंबर या दहा दिवसांत मोठी गर्दी दिसून आली.दरम्यान विठ्ठल-रुक्मिणी मातेचे १ लाख ५४ हजार २१६ भाविकांनी पदस्पर्श दर्शन, तर २ लाख २७ हजार २२१ भाविकांनी मुखदर्शन, असे एकूण ३ लाख ८२ हजार १३७ भाविकांनी देवाचे दर्शन घेतले आहे.