पेठ-त्र्यंबकेश्वर भागात भूकंपाचे सौम्य धक्के

प्रतिकात्मक छायाचित्र

🔷 पेठ- त्र्यंबकेश्वर तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के

नाशिक :  पेठ आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल, पेठ तालुक्यातील आडगाव भुवन, कुळवंडी, शेवखंडी,तालुक्यांतील काही भागांत शनिवारी (दि. ४) सायंकाळी ५ चा  सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली. गेल्या आठवड्यातही भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने ग्रामस्थांच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, तालुका प्रशासनाने याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाला कळवली आहे.

नत्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूलसह अनेक गावांत तसेच पेठ तालुक्यातील आडगाव भुवन, कुळवंडी, शेवखंडी, उस्थळे परिसरात सायंकाळी भूकंपसंदृश मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थ हादरले आहेत.