निजामबाद -पंढरपूर पॅसेंजर आता झाली एक्सप्रेस 

प्रतिकात्मक संग्रहित छायाचित्र
🔶 प्रवास भाविकांचा
बीड -परळी वैजनाथ – परळी मार्गे धावणाऱ्या  निजामबाद पंढरपूर – निझामाबाद पॅसेंजरला आता एक्सप्रेसचा दर्जा देण्यात आला असून, नवीन क्रमांकानुसार 11413/11414 निझामाबाद – पंढरपूर – निझामाबाद एक्सप्रेस म्हणून ही रेल्वेगाडी धावेल.

दरम्यान, 11414 पंढरपूर – निझामाबाद एक्सप्रेसच्या वेळापत्रकात परळी वैजनाथ ते निजामाबाद स्थानकांदरम्यान सर्व रेल्वे स्थानकांच्या वेळेत काही  बदल करण्यात आले आहेत. ही गाडी निझामाबाद स्थानकावर पूर्वीच्या तुलनेत 1 तास 40 मिनिटे लवकर पोहोचणार आहे, तसेच पंढरपूर ते निजामाबाद स्थानकादरम्यान सरासरी वेग 30.37 किमी प्रति तासाहून वाढून 33.55 किमी प्रति तास होईल. त्यामुळे पंढरपूर ला जाणाऱ्या श्रद्धाळु वारकरी भक्तांची सोय झाली आहे.

दरम्यान या रेल्वेगाडीचा कारेपूर स्थानकावरील थांबा दोन्ही दिशांनी कमी प्रवासी प्रतिसादामुळे रद्द करण्यात आला असल्याचे रेल्वेने कळवले आहे.