प्रतीकात्मक संग्रहित छायाचित्र
🔷 आज दुपारी २.२५ वा. हुजूर साहेब नांदेड स्थानकावरून मुदखेड, सिकंदराबादमार्गे धावणार.
नांदेड : राज्यातील महत्त्वपूर्ण मकर संक्रांति सणानिमित्त दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने प्रवासी नागरिकांची होणारी संभाव्य अतिरिक्त गर्दी लक्षात घेत गाडी क्रमांक (०७४८७- ०७४८८) नांदेड – काकिनाडा -नांदेड विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक (०७४८७) नांदेड – काकिनाडा ही गाडी ६ व १३ जानेवारी रोजी दुपारी २:२५ वाजता नांदेड स्थानकावरून प्रस्थान करेल.
ही गाडी मुदखेड, धर्माबाद, बासर, निजामाबाद, सिकंदराबाद, वारंगल, रायानपडू, राजमुंद्री, आणि सामलकोट या स्थानकावर थांबून मंगळवारी सकाळी ८:१० वाजता ही गाडी काकिनाडा स्थानकावर पोहचेल.
तर गाडी क्रमांक (०७४८८) काकिनाडा -नांदेड ही विशेष (स्पेशल) ट्रेन ७ व १४ जानेवारी रोजी धावेल. सायंकाळी ६:१०. वाजता ही गाडी काकिनाडा येथून सुटेल आणि आपला परतीचा प्रवास सामलकोट, राजमुंद्री, रायानपडू वारंगल, सिकंदराबाद, निजामाबाद, बासर, धर्माबाद, आणि मुदखेड मार्गाने दुपारी ३:१० वाजता नांदेड स्थानकावर पोहचेल.
या विशेष गाडीला जनरल, स्लीपर, वातानुकुलीत असे एकूण २२ डबे राहतील. प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा नजीकच्या आरक्षण केंद्रावरून तिकीट आरक्षण करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

