आपल्याच वरिष्ठ अधिकाऱ्यावर सीबीआयानेच (CBI) भ्रष्टाचाराचा गुन्हा केला दाखल

🔺CBI Files Case Against Its Corrupt Officer
लाच  भ्रष्टाचार
🔺अधिकारीच घ्यायचा लाच; 🔺लाखोंची रक्कम जप्त करत एजन्सीनेच दाखल केला गुन्हा 🔺 सीबीआयने 20 ठिकाणी धाडी टाकत लाखोंची रक्कम जप्त केली आहे.

🔶 बाह्य कारवाई अगोदर अंतर्गत दक्षता आवश्यक स्पष्ट संदेश सीबीआयचे संचालक प्रविण सूद यांनी दिला आहे.

नवी दिल्ली: तपासाकरिता आलेल्या लोकांकडून मध्यस्था मार्फत लाभ घेतल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. मुंबई स्थित आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर सीबीआयानेच (CBI) भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.  हा अधिकारी डीएसपी पदावर  बॅंक सुरक्षा आणि फसवणूक शाखेत कार्यरत होता. सीबीआयकडून सांगण्यात आले की, डीएसपी बी.एम. मीणा मध्यस्थांतर्फे लाचेची रक्कम घेत असे. हे पैसे अनेक बॅंक खात्यामधून आणि हवाला मार्गाने ट्रान्सफर केले जात होते, चौकशीत सीबीआयच्या अधिकारी तपासासाठी आलेल्या लोकांचा गैरफायदा घेत असल्याचे एजन्सींला आढळले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीबीआय ने भ्रष्टाचार आणि इतर गैरव्यवहारांविरुद्ध झिरो टोलरंन्सचे धोरण स्वीकारले आहे. दोषी अधिकारी ते आपल्याच विभागातील असतील तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल होत असून सीबाआयने डीएसपी बी.एम. मीणा यांच्याविरोधात एफआयआर(FIR) दाखल केला आहे. मीणांवर त्याच्याकडे तपासासाठी आलेल्या लोकांकडून गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. अधिकाऱ्यांच्या विरोधात तात्काळ कारवाई केली जाईल. बाह्य कारवाई अगोदर अंतर्गत दक्षता आवश्यक असल्याचा स्पष्ट संदेश सीबीआयचे संचालक प्रविण सूद यांनी दिला आहे.

20 ठिकाणी धाडसत्र, 55 लाख रक्कम जप्त

डीएसपी मीणा यांच्या प्रकरणामध्ये सीबीआयने मुंबई, जयपूर, कोलकाता आणि नवी दिल्लीत 20 ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. यामध्ये हवालाद्वारे पाठवण्यात आलेले 55 लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आल्याचे प्रवक्त्याने सांगितले. सीबीआयच्या धाडसत्रात तब्बल 1.78 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची कागदपत्रे सापडली असून 1.63 कोटी रुपयांच्या व्यवहारांच्या नोंदी आणि इतर संशयास्पद दस्ताऐवज ही जप्त केले गेले आहेत.