🔶 धार्मिक उपक्रम
◾वीरशैव समाजाच्या वतीने सर्व शिवाचार्यांचा सत्कार
बीड- परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तीर्थक्षेत्र परळी वैद्यनाथ शहरात श्री ष.ब्र. 108 नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठ, श्री ष.ब्र. 108 वरसाद्योजथा हरपनहल्ली शिवाचार्य महाराज, श्री ष.ब्र. 108 प्रशांतसागरा कुडलिगी शिवाचार्य महाराज आणि श्री ष.ब्र. 108 कैलासलिंग शिवाचार्य महाराज पुरगिरी यांच्या उपस्थितीत वीरशैव समाजाच्या वतीने एक भव्य धार्मिक समारंभ आयोजित करण्यात आले होते या समारंभात अनेक प्रमुख शिवाचार्य उपस्थित होते.
समारंभाच्या प्रारंभात सर्व शिवाचार्यांच्या हस्ते पंचम ज्योतिर्लिंग प्रभू श्री वैद्यनाथाची पूजा व आरती करण्यात आली. यावेळी मंदिर परिसरात “श्री वैद्यनाथ भगवान की जय”, “श्री मन्मथस्वामी महाराज की जय”, तसेच “संतश्री गुरूलिंग स्वामी महाराजांचा जयघोष” करण्यात आला.
यावेळी उपस्थित शिवाचार्यांनी धर्माचरण यावर समाज प्रबोधनही केले. शहरातील सर्व वीरशैव समाज बांधवांच्या वतीने श्रद्धेय सर्व शिवाचार्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान यावेळी समाजातील अनेक प्रमुख व्यक्तींची उपस्थिती होती.समारंभात वीरशैव महासभेचे तालुकाध्यक्ष महोदव इटके, माजी नगरसेवक रमेश चौंडे, वीरशैव विकास प्रतिष्ठानचे सहसचिव विकास हालगे, महाराष्ट्र वीरशैव सभा बीड जिल्हा कार्यकारिणी सदस्य दत्तात्रय गोपनपाळे, योगेश स्वामी महाराज, हर्षद राजेश साखरे यांसह अनेक प्रमुख पदाधिकारी व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.