🔺रस्ता सुरक्षा अभियान
बीड -( जिमाका ) :- रस्ता सुरक्षा म्हणजे प्रत्येक नागरिकाच्या जीवाचे संरक्षण, रस्ता सरळ आणि वाहने चालविणे बेताचे असेल तर आपण आपल्या जीविताचे संरक्षण करु शकतो. यासाठी रस्यासंतील दुभाजक, स्पीडब्रेकर, वळण रस्ता, चौक अशा ठिकाणी वाहन चालवण्याचे नियम वापरणे गरजेचे आहे. प्रत्येक ठिकाणी कायदा आपले संरक्षण करु शकत नाही तर आपणच घालून दिलेल्या नियमावलीचे पालन करावे, असे प्रतिपादन रस्ता सुरक्षा अभियानाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केली होती त्यावेळी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केले.
या बैठकीस खासदार बजरंग सोनवणे यांची विशेष उपस्थिती होती तसेच बालाजी धनवे, व्हि. डी. सपकाळे, गणेश जायभाये, शेखर अचार्य विविध विभागाचे संबधित अधिकारी उपस्थित होते.
मृत्युदर व अपघाताचे प्रमाण कसे कमी करता येईल यावर पुढील मुद्यांवर आढावा घेतला. रस्ते सुरक्षाबाबत काय उपायोजना केल्या,रत्याची प्रलंबित कामांचे प्रस्ताव नव्याने सादर करावेत, जिल्हा नियोजन समितीमधून निधी मंजूर करता आला तर तशी मागणी करता येईल. जिल्हयातील ब्लँक स्पॉटची स्पाटची तपासणी, जिल्हास्तरावर जिल्हा नियोजन समिती अंतर्गत रस्ता सुरक्षा उपाययोजना, जिल्हयातील अपघातांची संख्या कमी करणे, जिल्हयामध्मये होणा-या अपघाताची नोंद, दुभाजके तोडून शासकीय मालमत्तेचे नुकसान करणा-या व्यवसायिक आस्थापनावर कारवाई, ट्रामा केअर सेंटर आणि रस्त्या लगत असणारे प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हयामध्ये होणारी अपघाताची नोंद इरादा या ॲपबेस व वेबबेस प्रणालीवर नोंदविणे, दोषी वाहन धारकावर कारवाई करणे इत्यादी मुद्याचा आढावा या प्रसंगी श्री पाठक यांनी घेतला.
प्रस्ताविक व आभार प्रदर्शन कार्यकारी अभियंता व सदस्य सचिव आर.पी तोडें यांनी केले.
