नांदेड विभागात लाईन ब्लॉक; मराठवाडा व नरसापूर एक्स्प्रेस अंशतः रद्द

🔴 मुंबई-नांदेड आणि मुंबई-तपोवन या दोन्ही गाड्या विलंबाने धावणार.

हुजूरसाहेब नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात रेल्वे मार्गाच्या देखभाल आणि दुरुस्ती चे कामे वेगाने होत आहेत.  द म रेल्वेच्या नांदेड रेल्वे विभागातील रोटेगाव स्टेशन आणि परसोडा दरम्यान ८ ते १७ जानेवारी या कालावधीत रेल्वे मार्गाच्या  देखभाल व दुरुस्ती केली जाणार आहे. या दुरुस्तीसाठी लाईन ब्लॉक घेण्यात येत असून त्या मुळे या मार्गावरून धावणाऱ्या  मराठवाडा व नगसापूर एक्स्प्रेस अंशतः रद्द करण्यात आल्या आहे.

🔺 धर्माबाद -मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस नांदेड येथून तर नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेस लासूर येथून सुटेल. गाडी क्रमांक: १७६८८- धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस ही गाडी दि.९,१०, ११, १२, १३, १६, १७ व  १८ जानेवारीला धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द राहील. या तारखेस ही गाडी नांदेड ते मनमाड धावेल.

🔺गाडी क्रमांक (१२७८८) नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेस ही गाडी दि. ८, ९, १०, १२, १५, १६ व  १७ जानेवारीला नगरसोल ते लासूर दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे . या तारखेस ही गाडी लासूर येथून सुटेल. गाडी क्रमांक (१७२३२) नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेस ही गाडी ११ जानेवारीला नगरसोल- लासूर दरम्यान अंशतः रद्द राहील.

◼️ गाडी क्रमांक (१७६१७) मुंबई सीएसएमटी-नांदेड- तपोवन एक्स्प्रेस ही गाडी १०, ११, १२, १५, १६ व  १७ जानेवारीला मुंबई येथून १२० मिनिटे (२ तास) उशिराने सुटेल.