क्राईम / गुन्हे आणि गुन्हेगारी / वार्षिक आढावा २०२४
◼️ तीनही पोलीस ठाणे हद्दीतून वर्षभरात ३८ मोटरसायकलची चोरी.
◼️ गुन्हे दाखल न होण्याचे प्रमाण वार्षिक गुन्ह्याच्या तुलनेत १० ते १५ टक्के असल्याचा अंदाज.
बीड/परळी वैजनाथ -एम एन सी न्यूज नेटवर्क.– तीर्थक्षेत्र परळी वैजनाथ हे तसे धार्मिक स्थळ आहे. सातत्याने वेगवेगळे आणि अध्यात्मिक कार्यक्रम हरिनाम सप्ताह, रामायण कथा प्रवचन, भजन -कीर्तन, सत्संग आदि बाबीत रममाण होणार शांत व विनम्र नागरिक असणार शहर आहे. मात्र मागील काही वर्षात शहर आणि तालुक्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून खून बलात्कार, फूस लावून पळवणे, धाक जमवणे, झुंड शाही आणि गुंड प्रवृत्ती, वाहन चोऱ्या, घरफोड्या, दरोडे, रस्त्यात वाहन, मालवाहू ट्रक अडवून त्यांची लूट, आदि बाबतीत मोठ्या प्रमाणात प्रकाश झोतात आले. यातील अनेक गुन्हे दाखलच झाले नाहीत. एकूणच दाखल झालेल्या गुन्हे आणि तपशीलवार माहितीद्वारे परळी तालुक्याचा गुन्हेगारी आलेख चढता असल्याचेच दिसून येते.
शहर आणि तालुक्यातील गुंड प्रवृत्ती, गुन्हे आणि गुन्हेगारीचा आलेख परळी वैजनाथ तालुकाच नव्हे तर जिल्हाभरात वाढतो आहे. गुन्हे दाखल झाले तरी त्यातील वाढलेल्या गुन्ह्याचा दोष सिद्धी आणि उकल फार क्वचित झाल्याचे दिसून येत आहे. परळी तालुक्यात बराच वेळात गुन्हे दाखल होण्याची प्रक्रिया अतिशय धीमी आणि संथ असल्याचेही मागील काही वर्षभरातील घडलेल्या दाखल गुन्ह्यावरून दिसून येते. गुन्हा दाखल करणे ही मोठी धाडसाची आणि जिकरीची परंपरा तालुक्याला लाभल्याच अनेक गुन्हे दाखल करताना सर्व सामान्य नागरिकांना आलेल्या अडचणी आणि संवादातून दिसून आलं.
◼️ वर्षभरात १०९ मृतदेह – मागील वर्षभरात परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण ६६ मृतदेह आढळून आले त्यापैकी ६४ मृतदेहाची ओळख पटली तर २ मृतदेहाची ओळख पटली नाही.त्याचप्रमाणे परळी शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये एकूण १७. मृतदेह आढळले सर्वांची ओळख पटली. तर परळी संभाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत २६ मृतदेह आढळले त्यातील २१ मृत देहाची ओळख पटवण्यात आली तर ४ मृत देहाची ओळख पटली नाही. एकूणच ३ पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागील वर्षभरात १०९ मृतदेह शहर आणि परिसरात आढळून आले. मात्र त्याचा तपास जेमतेम होऊन प्रकरण फाईल बंद झाली.
तालुक्यात मारामारीच्या अनेक घटना नियमित घडल्या. यात रेती आणि राखेत आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अनेक भांडणे झाली. यातील अनेक प्रकरणे पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचतच नाहीत. काही प्रकरणात गुन्ह्याचा उलगडा तर होतो आणि आरोपींनाही अटक केली जाते. मुद्दे माल हस्तगत होतो, मात्र न्यायालयात सदर आरोपीवरील गुन्हा सिद्ध करण्यात काही वेळा अडचणी येतात , निर्माण केल्या जातात तर काही वेळा सबळ पुरावा सादर केला जात नाही
शहरातील महिला अत्याचार आणि ॲट्रॉसिटी चे गुन्हे हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.विनयभंग आणि बलात्काराचे प्रयत्न अशा सदरातील अनेक गुन्हे शहरात मागील वर्षभरात घडले. काहींच्या मते हे गुन्हे सहेतू समोरील व्यक्तीवर जरब आणि दहशत बसवण्यासाठी केले गेले. मात्र हा गुन्हा दाखल करणारी महिला, व तिचे कोणी नातेवाईक या दाखल करताना असलेल्या गर्दीतील कोणी पुन्हा या दाखल गुन्ह्याच्या संदर्भात कधीही चौकशीसाठी आल्याचे दिसून आले नाही.
तालुक्यात दुचाकी, चार चाकी वाहन चोरीच्या अनेक घटना घडल्या, तक्रार दाखल करून घेण्यापासून ते वाहनाच्या शोध घेण्यापर्यंत एकूणच निरुत्साह शहरातील ३ ठाण्यात दिसून आला.
काही वर्षांपूर्वी परळीची बाजारपेठ मराठवाड्यात नावाजलेली होती. कृषी चे बाजार भाव अकोला मार्केट मधून जाहीर व्हायचे. त्यानंतर दिवस बदलले अडते बाजार, कॉटन मार्केट, किराणा आणि भुसार लाईन याचं मूल्य आणि अस्तित्व हळूहळू कमी झालं. सद्यस्थितीत एकूणच तालुक्यात फार मोठे उद्योग नसले तरी औष्णिक वीज निर्मिती केंद्र, सिमेंट फॅक्टरी , आणि शिरसाळ्या नजीक असलेल्या सोलार प्लांट मधून कोट्यावधी रुपयाच्या वस्तूंची चोरी झाल्याच्या घटना तालुक्यात घडल्या. याचा तपासही पोलीस दरबारी फक्त गुन्हा दाखल करून घेणे आणि शांत राहणे असाच असतो असं स्थानिक नागरिक कुजबुजत असतात. तालुक्यातून मुख्य रूपाने दिसून येणारा उद्योग म्हणजे बाजारपेठ नसून मोफत आणि मुबलक मिळणारी राख, अवैध रेती, आणि राखेवर आधारित हजारो वीट भट्ट्या एवढीच आहे. यात राजकीय वरदहस्त असणाऱ्या मंडळींचा खुलावावर तालुक्यात रेती, राख माफिया फोफावण्याच्या दृष्टीने मदतीचा ठरल्याचंच एकूण चित्र आहे.
………………………….
………………………………………………………………
🔹परळी शहरात एकूण तीन पोलीस ठाणे असून यात परळी शहर पोलीस स्टेशन, संभाजीनगर परळी वैजनाथ पोलीस स्टेशन, आणि परळी ग्रामीण पोलीस स्टेशन आहेत.मिळालेल्या माहितीनुसार
🔺संभाजीनगर परळी पोलीस स्टेशन – १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीमध्ये दाखल गुन्ह्याचे प्रकार आणि त्याची संख्या खालील प्रमाणे आहे.
खुन …१, खुणाचा प्रयत्न २, बलात्काराचे ७ गुन्हे, जबरी चोरीचा १, घरफोडीचे ४ तर चोरीचे इतर सर्व प्रकार यात ८ गुन्हे नोंदल्या गेले आहेत. मोटरसायकल चोरीचे एकूण ११ गुन्हे नोंदले गेले आहेत. वायर या चोरी प्रकारात २ गुन्हे नोंदल्या गेले आहेत. गोठ्यातील जनावर चोरी जाण्याचा १ गुन्हा नोंद असून, ट्रक चोरी ही १ झाली आहे. फसवणुकीचा १ गुन्हा नोंदला गेला असून, फुस लावून पळवणे या प्रकारात ४ गुन्हे नोंदल्या गेले आहेत. तर पोस्को कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्याचे संख्या ३ आहे. आणि संपलेल्या वर्षात एकूण २६ मृतदेह ही संभाजी नगर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात आढळून आले. त्यापैकी २६ मृतदेहाची ओळख पटली तर ४ मृतदेहाची नाही.
………………………….
🔺परळी शहर पोलीस स्टेशन – १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीमध्ये दाखल गुन्ह्याचे प्रकार आणि त्याची संख्या खालील प्रमाणे आहे.एकूण दाखल गुन्हाची संख्या ५९ असून यातील २९ गुन्ह्याची उकल झाल्याचे पो.नि. रघुनाथ नाचन यांनी सांगितले.
खुन …१, खुणाचा प्रयत्न ३, बलात्कार- १ गुन्हा, दरोडा चा १, घरफोडीचे ५ तर चोरीचे इतर सर्व प्रकार यात १७ गुन्हे नोंदल्या गेले आहेत. मोटरसायकल चोरीचे एकूण १३ गुन्हे नोंदले गेले आहेत. जनावर चोरी जाण्याचा १ गुन्हा नोंद असून, पिकप चोरी ही १ झाली आहे. मोबाईल चोरीचे तीन गुन्हे दाखल झाले ,फसवणुकीचा ३ गुन्हे नोंदले गेला असून, फुस लावून पळवणे या प्रकारात ३ गुन्हे नोंदल्या गेले आहेत. तर पोस्को कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्याचे संख्या २ आहे.
🔺संपलेल्या वर्षात एकूण २६ मृतदेह ही संभाजी नगर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात आढळून आले.
एकूण दाखल ५९ गुण्या पैकी २९ गुन्ह्याची उकल झाल्याचेही पोलीस निरीक्षक यांनी यावेळी सांगितले.
…………………………
🔺परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचा गुन्हे दाखल होण्यात सर्वात वरचा क्रमांक लागतो. वर्ष १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ अखेर परळी ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये एकूण सर्व दाखल गुन्ह्याची संख्या ३८६ आहे. तर गुन्हे उकल झालेल्या गुन्ह्याची संख्या ३४८ एवढी आहे.
परळी ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये संपलेल्या वर्षात दाखल गुन्ह्याचे प्रकार आणि त्याची संख्या खालील प्रमाणे..
खुन …१, खुणाचा प्रयत्न ५, बलात्कार- ३ गुन्हे, दरोडा चा ३ , जबरी चोरी या प्रकारात १ गुन्हा, घरफोडीचे ९ , तर चोरीचे इतर सर्व प्रकार यात १७ गुन्हे नोंदल्या गेले आहेत. मोटरसायकल चोरीचे एकूण १४ गुन्हे नोंदले गेले आहेत. शेतातील वायर चोरी चे ३ गुन्हे दाखल झाले होते. जनावर चोरी जाण्याचा ३ गुन्हे नोंद असून, ट्रक चोरी जाण्याचे ३ गुन्हे घडले आहेत. कार चोरी १ गुन्हा, तर पिकप चोरी ही १ झाली आहे. फसवणुकीचे ६ गुन्हे नोंदले गेले आहेत. फुस लावून पळवणे या प्रकारात १ गुन्हा नोंदला गेला आहे. तर पोस्को कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्याचे संख्या ५ आहे. हुंडाबळी चे दोन गुन्हे गत वर्षात दाखल झाले आहे.
🔺संपलेल्या वर्षात एकूण ६६ मृतदेह परळी ग्रामीण पोलिसांच्या ठाणे कार्यक्षेत्रात आढळून आले त्यापैकी ६४ मृतदेहाची ओळख पटली तर २ पुरुष जातीचे मृतदेह ओळखला गेले नाहीत.
…………………………
🔶 परळी ग्रामीण पोलीस स्टेशन चा कारभार पहावयास ३६ कर्मचारी आहेत. या मध्ये ३ अधिकारी आणि ६ महिला तर उर्वरित पुरुष कर्मचारी आहेत.
🔶 सरत्या वर्षामध्ये चोरी गेलेला मुद्देमाल १ कोटी ४७ लाख ३५ हजार ७०० रुपये आहे. तर रिकव्हर केलेला मुद्देमाल ४९ लाख ३२ हजार ८००/- रुपये इतका आहे. परळी शहर आणि परळी संभाजी नगर या दोन पोलिस ठाण्याची गेला मुद्देमाल ही आकडेवारी मिळू शकली नाही .